सुट्टीच्या दिवशीही पालिकेत ४२ लाखांचा भरणा

0

जळगाव :- मनपा प्रशासनाने आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षाचा कर भरणाऱ्या नागरिकांना आपल्या बिलामध्ये १० टक्के सूट दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांनी रविवारी देखील कर भरणासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी सुट्टीचा दिवस असतांनाही ४२ लाख ६८ हजार रुपयांचा भरणा झाला आहे.

करावर १० टक्के सूट मिळविण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत शेवटची मुदत असून आज सोमवारी व उद्या मंगळवारी मनपात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त खिडक्या उघडल्या जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.