संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या कोरोना विषाणूच्या विळख्यात नेतेमंडळी देखील अडकले आहेत. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

ते म्हणाले की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि चाचणी करून घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.