संगित स्पर्धेत गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थीनींचे यश

0

पाचोरा (प्रतिनिधी) श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा  येथील संगीत विभागातील  विद्यार्थिनींनी, भारत विकास परिषद आयोजित “चेतना के स्वर” या समूहगित गायन स्पर्धेत यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लातूर येथे निवड झाली आहे. या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी  समूहगीत सादर केले होते. कु. हिमगौरी राजपूत, गुंजन पाटील, श्रद्धा शेंडे, वैष्णवी पाटील, श्वेता वाघ, श्रद्धा बोरसे यांना सागर थोरात आणि रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यायशस्वी विद्यार्थीनींचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हाईस चेअरमन विलास जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एस. डी. पाटील व शिक्षक – शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.