भडगावात कत्तलखाण्यात जाणाऱ्या गायींची सुटका

0

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळगाव येथे महिंद्रा बोलेरो पिक अप गाडीतून कत्तलखाण्यात जाणाऱ्या ४ गायी व १ वासरू घेऊन जात असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कोळगाव आऊट पोस्टला माहिती देऊन पकडून दिली. या बाबत रात्री उशिरापर्यंत भडगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कोळगाव येथे मेहूनबारे रस्त्यावर महिंद्रा बोलेरो गाडी नंबर एम एच.१९. एस.५३६९ ह्या गाडीतून गायी व वासरू कत्तल खाण्यात घेऊन जात आहे अशी माहिती बजरंग दलाच्या कार्यकते समाधान महाजन, समाधान वारुळे, राहुल महाजन, निलेश वाघ यांना मिळाली या बाबत ही माहिती त्यांनी कोळगाव पोलिसांना दिली व सायंकाळी सहा दरम्यान कोळगाव च्या पुढे पकडली त्या ठिकाणी बोलेरो चालकाला या बाबत विचारणा केली असता त्याजवल कुठल्याही प्रकारची पावती व परमिट नव्हती. या बाबत सरळ कार्यकर्त्यांनी भडगाव येथील वि.ही.प.चे जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद बोरसे व नाना हाडपे यांना भ्रमणद्वानी वरून माहिती दिली. व सरळ पोलिस स्टेशन ला गाडी जमा केली असता गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. व गाडी चालकाला ताब्यात घेतले आहे. गाडीतील गाई, व वासरू हे एका शेतात उतर्वण्यात आल्या व उद्या गाई व वासरू ह्या अमळनेर येथील गो शाळेत जमा करण्यात येतील असे मिलिंद बोरसे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.