एरंडोल येथे पोषण महिन्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन !

0

एरंडोल प्रतिनिधी  | येथे फकीरवाडा,केवडीपुरा,गांधीपुरा व जहांगीर पुरा या चारही विभागातील अंगणवाडी केंद्रे व एरंडोल नगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३० सप्टेबर दरम्यान पोषण महिना निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी पालक मेळावा घेण्यात आला.यावेळी बालकांचे पहिले एक हजार दिवस,अनोमिया,अतिसार,पौष्टिक आहार,वैयक्तिक स्वच्छता,कुपोषण निर्मुलन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी होते.यावेळी नागरी बालविकास प्रकल्पाचे अधिकारी विजयसिंह परदेशी,उपनगराध्यक्ष नितीन महाजन,नगरसेवक जाहिरोद्दिन शेख,नगरसेविका वर्षां शिंदे,प्रतिभा पाटील,मुख्यसेविका एच.एस.पाटील,न.पा.प्रशासन अधिकारी संजय ढमाळ,महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेविका कल्पना लोहार,सीमा बागड,कल्पना तिवारी,प्रतिभा पाटील,पुष्पलता डहाके,सरला महाजन,अनिता सोनवणे यांनी परिश्रम घेतले.एरंडोल शहरात अजुन नवीन अंगणवाडी केंद्राची आवश्यकता आहे व अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.