दारू बंदीसाठी नागदुली येथील महिलांचा एल्गार !

0

एरंडोल (प्रतिनिधी)  |  तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावरील नागदुली येथील महिलांनी व तरुणांनी २० सप्टेबर २०१९ रोजी पंचक्रोशीतील हात भट्टीची दारू भट्ट्या उध्वस्त केल्या नंतर या संतप्त झालेल्या महिलांनी २०० लिटरचे ३५ ड्रम,एरांड्या,नवसागर आणि गळलेली दारू घेऊन संतप्त महिला तिन ट्रक्टर मध्ये भरून दुपारी अडीच ते तिन वाजेच्या दरम्यान त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशन गाठले.दारू विरोधात सदर महिलांचा रुद्रावतार पाहून तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनच्या आवरत कामानिमित्त आलेले नागरिक आवक झाले.सदर महिलांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले.सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाने दारू बंदी करण्याबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले.

एरंडोल तालुक्यातील नागदुली या गावात हात भट्टीची दारू बऱ्याच दिवसापासुन बोकाळली होती.गावात “तळीरामांची “संख्या वाढत होती.दारूपायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्न देखील जुळत नसल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.विशेष महत्वाची बाब म्हणजे नागदुली ग्रामपंचायतीवर मनीषा अहिरे या ग्रामसेविका कार्यरत असुन त्यांनी दारू बंदीसाठी पुढाकार घेतला.त्यामुळे त्यांना दारू विक्रेत्यांनी दमदाटी व धमक्या दिल्या अशा हि तक्रारी पुढे आल्या आहेत. या त्रासाला कंटाळुन व सहानशीलतेचा अंत झाल्यामुळे महिलांनी स्थानिक ग्रामपंचाय तिकडे व एरंडोल पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले.विशेष हे कि नागदुली ग्रामपंचायतीने दारू बंदीचा ठराव २१ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या ग्रामसभेत संमत केला आहे.पण तरी सुद्धा दारू व दारूड्यांवर नियंत्रण झाले नव्हते.शेवटी त्रस्त व संतप्त महिलांनी २० सप्टेबर रोजी एरंडोल पोलीस स्टेशन गाठले.तसेच यापुढे दारू बंदी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान रात्री उशिरा पर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनाला गुन्हा दखल करण्याचे काम सुरु होते.आता या पुढे नागदुली गावात खरोखर दारूची बाटली आडवी होणार काय ?

Leave A Reply

Your email address will not be published.