श्री गुरुचरित्र कामधेनू जाण : तुची एक कृपासिंधु ….!

0

बावन्न श्लोकी गुरुचरित्र या छोट्याश्या पुस्तकात गुरुंचा महिमा व दत्त अवताराचे महत्व विषद करण्यात आले आहे. तिन मुखांचा दत्त त्रिगुण गुणांचे सत्व, रज, तम यांनी युक्त होते. सगुण भक्तित आजही गुरुचरित्र घराघरात पारायण करुन वाचले जाते. कृष्णा-भिमा-अमळजा संगमावर नित्य स्नान करुन भिक्षेला माहुरगडावर जाणारे दत्त दिगंबर ब्रम्हा विष्णु महेश या तीन देवांचा संगम आहे. आपल्या भक्ताला भवसागरातुन तारुण नेणारे दत्तगुरुंपासून नाथ सांप्रदायाची अविरत धारा या पृथ्वीतलावर प्रवाहित आहे.

जयजयाजी सिध्दमुनी । तू तारक भवर्णावातुनी ॥

संदेह होता माझे मनी । आजि तुवां कुडे केले ॥

तु गुरुंचा गुरु आहे. तु संसारातुन तारुण नेणारा तर आहेच. परंतू संशय शंकांचं निसरण करणारा श्रीपादवल्लभ तू आहेस. जगात अनेक तिर्थे आहेत, परंतु तुझं वास्तव्य प्रिती संगमावर गाणगापुरी आहे. सागर पुत्रासाठी भगीरथाने या भुतलावर गंगा आणली ही दत्तगुरुंची कृपा आहे. श्री दत्तात्रयांचे मुळ स्वरुप कसे आहे :-

दिगंबरा भस्मसुगंधलेपनं चक्र, त्रिशूल डमरु गदा चं ॥

पद्‌मासनस्थं रविसोमनेत्र  दत्तात्रेयं ध्यानम्‌ भिष्ट सिध्दीदम्‌ ॥ 

अंगावर सुगंधी भस्माचा लेप लावला आहे.  हातात शंख, चक्र, गदा, पदम, डमरु व दुष्टांचा नाश करण्यासाठी गदा आहे. अहंकार मदात चूर्ण झालेल्या निद्रीस्त जगाला जागविण्यासाठी शंख आहे. महाभारतात कौरव सेनेला भयाने कापरे भरले जात होते तो कृष्णपरमात्म्याच्या हातातील पांचजन्य शंख आहे. त्रिशूल हे आयुद्घ  तीन दोष नष्ट करणारे आहे. डमरु वादन करुन भगवान शंकर तांडवनृत्य करायचे तेच डमरु भगवान दत्त महाराजांच्या हाती आहे. ज्यांना अध्यात्मीक भाषेत ग्रामसिंह म्हटले जाते ते कुत्रे आजूबाजुला हाती आहे. पाठीमागे कामधेनू नावाची गाय आहे. असे दत्तप्रभु गिरणार पर्वतावर समाधी अवस्थेत राहतात.

संसारी मानवाला काम, क्रोध, मद, मत्सर अहंकार या षडरिपुंनी त्रस्त करुन सोडले आहे. त्यांचा नाश  करण्यासाठी दत्त कृपा होते व ही कृपा काही सहज होत नाही त्यासाठी तप करावे लागते. कलियुगात औदूंबराच्या वृक्षाखाली श्रीगुरुदेव दत्त राहतात, म्हणून हिंदु धर्मात व दत्त सांप्रदायात हा वृक्ष देववृक्ष म्हणून मानला जातो. श्रीदत्तात्रय स्त्रोत्र संस्कृत भाषेत आहे. 19 ओवींचे हे स्त्रोत्र श्रीदत्तगुरुंना नित्य आळविण्यासाठी पठण केले जाते. कृपामूर्ती यतिराया म्हणूनही दत्त महाराज भक्तांना पावतात.

दिगंबरा दिगंबरा । श्रीपादवल्लभ दिगंबरा । हे भजन सरस्वती गंगाधर या कवींनी याची रचना करुन लोकांपुढे ठेवली. अमोल पब्लिकेशन पुणे यांनी बावन्न श्लोकी गुरुचरित्र या पुस्तिकेत श्रीगुरुपादुकाष्टम 10 अभंग, पद श्री दत्तात्रेय स्त्रोत्रम, पदे, दत्तबावन्नी यांचा या पुस्तीकेत समावेश केला आहे.

मानवी मन अनिवार आहे. ते सदैव निरिच्छ वस्तूंची इच्छा करते. पैसा, धन, संपत्ती, बायका, पोरे, गणगोण, नातीगोती हया संबंध बाबी नाशिवंत आहेत. मुनष्य देह देखील नाशिवंत आहे. पण भगवत्‌ भक्ति श्रीगुरुचरित्राचे पारायण यामुळे मानवाला निश्चितपणे मुक्ती मिळेल. जन्म मरणाचा फेरा टळणार म्हणून दत्त उपासनेचे महत्व येथे अधोरेखीत केले आहे.

 

रमेश जे. पाटील

मु.पो. आडगांव

ता. चोपडा जि. जळगाव

मो. 9850986100

Leave A Reply

Your email address will not be published.