शेती विषयक तीन काळे कायदे रद्द करा; राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रपतींना निवेदन

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

राष्ट्रीय किसान मोर्चाची शेती विषयक तीन काळे कायदा विरोधात जन आक्रोश रोड रॅली काढण्यात आली. अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात बनवलेल्या तीन काळे कायद्या विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित शेतकरी बांधवांनी  शेतकरीविरोधी पास झालेल्या तीन काळ्या कायद्या विरोधात घोषणा दिल्या व तेथून दुचाकीने रॅली तहसील कार्यालयावर धडकली. तेथेही घोषणाबाजी केली.

त्यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील व  शिवाजी नाना पाटील यांनी भाजप सरकारने पास केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात माहिती दिली, व भाजप सरकारच्या अर्थव्यवस्थेचे अपयश, शासकीय संस्था, संघटन विक्री संदर्भात स्पष्टीकरण केले. याप्रसंगी महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, कोविड १९ च्या काळात मजुरांच्या संदर्भात पास केलेले कायदे मागे घ्या, विद्यार्थ्यांसंबंधी पास केलेले कायदे रद्द करून गरीब व श्रीमंत यांच्या (राजा और रंक) मुलांना समान शिक्षण मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही तोपर्यंत शेतकरी वीज बिल भरणार नाहीत व कोणतेच कर्जही भरणार नाहीत. तसेच संपूर्ण देशातील पुढील निवडणुकातुन EVM हद्दपार करा व बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या,आदी मागण्या करण्यात आले आहे.

जन आक्रोश रॅलीत विश्वासराव पाटील, रमेश बोढरे, शामकांत पाटील, सुरेश पिरन पाटील, बी.के. सूर्यवंशी, कुद्रतअली मोहम्मद अली, शालिग्राम पाटील, शांताराम पाटील, जितेश संदानशिव,  प्रा. सुभाष पाटील, शिवाजी नाना पाटील, सुनील पाटील, प्रमोद बिऱ्हाडे  इत्यादी सह अनेक शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.