शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खणाऱ्यांची गय केली जाणार नाही ; आ. मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील शेतकी संघात (डमी) शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांच्या मका, ज्वारी, हरभरा विकला जात होता याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली होती. यामुळे खरे शेतकरी बाजूला राहून शेतकी संघाचे काही पदाधिकारी यांच्या संगनमताने काही मोजके व्यापारी हे आपला शेतीमाल विकत होते. दोनच दिवसांपूर्वी याबाबत आमदार चव्हाण यांनी राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सविस्तर पत्र देऊन खऱ्या शेतकऱ्यांचा शेतात पडून असलेला शेतीमाल तात्काळ खरेदी करण्यात यावा अशी विनंती केली होती. मात्र याबाबत काहीही कार्यवाही होत नसल्याने आज मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून एका व्यापाऱ्याचा हरभरा विक्रीसाठी शेतकी संघात येत असल्याचे कळाले. एकीकडे सुट्ट्या आणि पावसाचे कारण दाखवून कापूस व मका खरेदी बंद केली जाते.

मात्र, दुसरीकडे रविवारी सुट्टी असूनही व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याचा गंभीर प्रकार लक्षात आला. जवळपास २ मोठ्या वाहनांमध्ये १०० क्विंटल हुन अधिक हरभरा त्याठिकाणी मोजला जात होता. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी, तहसिलदार व पोलीस प्रशासन यांना कळवून या प्रकरणी जे जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा सूचना दिल्या. यात जे कुणी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सहभागी असतील त्यांची गाय केली जाणार नाही, असे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकारी व जनते समोर ठणकावून सांगितले.

शेतकी संघात शेतकऱ्यांचा नावाने व्यापारांच्या मालविक्रीचा संगनमताने चाललेल्या लूटीबाबतच्या घटनेचे जाबजबाब चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चालू असून या गंभीर घटने बाबत चाळीसगाव शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.