भालगाव येथे दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी ; १ लाख ४४ हजाराचा ऐवज लंपास

0

एरंडोल (प्रतिनिधी) : अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचे कुलूप बंद दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून १ लाख ४४ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना दिवसाढवळ्या १४ जून २० रोजी तालुक्यातील भालगाव येथे दुपारी घडली या धाडसी चोरीमुळे भालगाव परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश छगनलाल मानधने व त्यांची आई हे दोघेच भालगाव येथे घरात राहत असून ते दोघे येथे कामासाठी शेतात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे दरवाज्याचे बंद कुलूप बनावट चावीने उघडण्यात आले व घरातील सोन्याचे दागिने ३७ हजार ५०० रुपये किमतीचा एक 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ४२ हजार ५०० रुपये किमतीची २.५ ग्रॅम ,५ ग्रॅम, १.५ ग्रॅम, ४ ग्रॅम, २.५ ग्रॅम, ६ ग्राम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, २१.५ ग्रॅम वजनाच्या एकूण सहा सोन्याच्या अंगठ्या, ६४ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ४४ हजार रुपये किमतीच्या एवजा वर अज्ञात चोरट्यांनी हात मारून पोबारा केला.

याबाबत दिनेश मानधने यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून रात्री उशिरा भाग ५ गु.र.न.३१/२०, भा.द.वि. कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, अखिल मुजावर मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.