शेतकरी महिलेचा गहू काढण्याच्या हेडममध्ये हात जाऊन मृत्यू

0
जामनेर(प्रतिनिधी):-तालुक्यातील शेळगाव  येथील रहिवाशी सविता सुरेश पायघोण वय 45 ह्या शेतकरी महिलेचा डावा हात गहू काढण्याच्या हेडम मशीन मध्ये जाऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.19 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. गेल्या दोन दिवसांपूर्वी तळेगाव शेळेगाव सह परिसरात अवकाळी पावसाने शेतातील गहू हरभरा ह्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने होते.हाता तोंडाशी आलेला घास जाऊ नये म्हणून शेतकरी हा घाई गरबडीमध्ये शेतातील पीक काढून घरात आणण्यात व्यस्त झाला आहे. त्याप्रमाणेच मयत सविता ह्या आपल्या परिवारा सोबत दि .19 रोजी स्वतः च्या शेतात गहू काढण्यासाठी गेल्या होत्या गहू काढणाऱ्या हेडम मशीन मध्ये अति घाई करण्याच्या नादात त्यांचा डावा हात गेला.त्याच्या आरडाओरड करण्याने त्वरित मशीन बंद करून त्यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलेअसता.डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चांदा यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.