भडगाव तालुक्यात रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरांवर गुन्हे दाखल

0
भडगाव पोलिसांची कार्यवाही, वाळू माफियांचे धाबे दणाणले.
भडगाव -प्रतिनिधी
भडगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर भडगाव पोलिसांनी रात्री गस्त (पेट्रोलिंग) करत असताना वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडले. व त्यांच्यावर सरळ पाच वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे या पोलिसांच्या कार्यवाही मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून अशीच कार्यवाही महसूल प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री १२:३० ते ४:३० भडगाव पोलिस उपनिरीक्षक- सुशील सोनवणे, पोलिस नाईक- लक्ष्मण पाटील, पो.हे.कॉ. भगवान बडगुजर, भाऊसाहेब पाटील, ईश्र्वर पाटील, चालक संभाजी पाटील यांचे पथक हे रात्री शहरासह तालुक्यात गस्त (पेट्रोलिंग) करत असताना तालुक्यातील वाक- वडजी रस्त्यावर व भट्टगाव गिरणा नदी पात्रात वाळू भरत असताना, पाचोरा चौफुली, पारोळा चौफुली वर पाच ट्रॅक्टर वाळू भरताना व वाहतूक करताना सापडले असता माणसांना विचारले की, तुमच्याकडे पास परमिट चा परवाना आहे का अगर कसे असे विचारणा केली असता कुठल्याही ट्रॅक्टर कडे वाळू वाहतूककीचा परवाना नसल्याने वाळूची चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. पाचही ट्रॅक्टर मालक- चालक यांच्याविरूद्ध फिर्यादी – लक्ष्मण अरुण पाटील – पोलिस नाईक भडगाव यांच्या फिर्यादीवरून १) गणेश युवराज भोसले रा. भडगाव पेठ, २) राकेश सुधाकर पाटील रा. वाक ता भडगाव, ३) जनार्दन सखाराम जगताप रा. पाचोरा, यांच्याविरूद्ध भाग ५ गु .र.ण. ५५,५६,५७/ २०२० भा. द. वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच १) समाधान ईश्र्वर पाटील रा. अंतुरली ता. पाचोरा,२) करण दयाराम सूर्यवंशी रा. चिंचखेडा ता. पाचोरा यांच्याविरूद्ध कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच ट्रॅक्टर पैकी एम. एच.१९ बी. जी.८०८१ हे एकच ट्रॅक्टर नंबरचे आहे व बाकी चार ट्रॅक्टर बिना नंबरचे आहे. या पैकी दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालइन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाचही ट्रॅक्टर ट्राली सह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनखाली पो. हे. कॉ. किरण ब्राम्हने,पो. हे. कॉ. पांडुरंग गोरबंजारा,पो. हे. कॉ. भगवान बडगुजर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.