भुसावळातील दोघे वर्षभरासाठी हद्दपार

0
भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील दोघांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी काढले.
    शहरातील रहिवासी असलेले योगेश देविदास तायडे आणि अक्षय रतन सोनवणें यांच्या विरूध्द विविध गुन्हे दाखल असल्याने दोन्ही जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी काढले असून  दोन्ही जणांना बाजारपेठ पोलिसांनी हद्दपारीच्या नोटीसा बजाविल्या आहे. योगेश देविदास तायडे याच्याविरूध्द 10 गुन्हे दाखल असून अक्षय सोनवणे याच्या विरूध्द तीन गुन्हे दाखल आहे. दोन्ही जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव बाजारपेठ पोलिसांनी तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात पाठविले होते. पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावांची पडताळणी होऊन संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ.उगले यांनी दोन्ही जणांच्या जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीचे आदेश शुक्रवारी काढले. हे आदेश मंगळवारी या दोघांना पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बजावले. दोन्ही जणांविरूध्द गुन्हे दाखल असल्याने दोन्ही जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. शहरातील अजून ही काही जणांचे प्रस्ताव अधीक्षक यांच्याकडे पाठविले असून काही प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविले आहे. त्यावरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता डीवायएसपी गजानन राठोड यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.