शेंदुर्णीत जनता कर्फ्युस चांगला प्रतिसाद

0

शेंदुर्णी, ता.जामनेर (प्रतिनिधी) : सध्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेंदुर्णीत सर्वानुमते जनता कर्फ्यु चे स्वयंस्फुर्तीने चार दिवस आयोजन करण्यात आले असुन पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. यामुळे शहरात या जनता कर्फ्युस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आषाढी एकादशीला शेंदुर्णीत दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात यंदा मात्र करोनामुळे श्री.त्रिविक्रम मंदिर व ईतर सर्व मंदिरे बंद राहणार असुन गावातील बाजारपेठ सुद्धा बंद राहणार आहे. तेव्हा गावातील व बाहेर गावातील भाविकांची दर्शनासाठी शेंदुर्णीत येऊ नये असे आवाहन शेंदुर्णीत झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. व्यापारी संघांची समजुत काढुन त्यांची नाराजी दुर करण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर सर्व बाजारपेठ पुर्णपणे बंद झाली आहे. यामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पुर्णपणे बंद होती.

यासाठी मुख्याधिकारी साजिद पिंजारी पोउनि. किरण बर्गे, चेडे तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,नगरसेवक, पत्रकार ,नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी शहरात फिरुन करोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टंशन ,मास्कचा वापर, वेळोवेळी हात धुवावे,विनाकारण घरा बाहेर पडु नये,अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन तसेच आषाढी एकादशीला श्री.त्रिविक्रम मंदिर तसेच ईतरही मंदिरे बंद राहणार आहे तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.