नाट्य गृहाची दुरूस्ती करायला जामनेर न.पा.ला मुहूर्त सापडेना

0

जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील नगर पालिकेचे मालकी हक्क असलेले शंकर नगर हिवरखेडा रोड भागात असलेल्या नाट्य गृहाची अतिशय दैनीय अशी दुरावस्था झालेली असून जामनेर नगर पालिका प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

जामनेर नगर पालिकेने शंकर नगर मधील १२ हजार स्वे.फूट येवढ्या मोठ्या ओपन स्पेस मध्ये लाखो रुपये खर्च करून भव्य असे नाट्य गृह उभारणीचे काम गेल्या१० वर्षापूर्वी केलेले आहे.त्यात संडास भाथरूम,सभामंडप,दोन रूम व सभोवताली वाल कंपाऊंड चे बांधकाम झालेले आहे. परंतू आज रोजी या सरकारी मालमत्तेचे आतोनात नुकसान झालेले आहे. शौचालयाला फार मोठे बोगदे पडलेले असून त्याठिकाणी कॉलनीतील मुले खेळत असल्याने त्यांच्या आंगावर भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच नाट्य गृहात प्रवेश करण्यासाठी लोखंडी गेट बसविलेले असून त्या गेटची सुध्दा दुरावस्था झालेली आहे.ते गेट भुरट्या चोरांकडून चोरी होण्याची शक्यता आहे. ह्या सर्व गोष्टी नगर पालिका प्रशासनाला कळवून देखील नगर पालिका प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासनाला नाट्य गृहाची दुरुस्ती करण्यास मुहर्त कधी सापडेल? या विषयावर परिसरात चर्चा होताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.