शिवसेना व युवा सेनेच्यावतीने बाळासाहेबांना आदरांजली

0

आमदार सावकारे मान्यवरानी वाहिली श्रद्धांजली
भुसावळ (प्रतिनिधी )- शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ शिवसेना व युवा सेनेच्या वतीने बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली . स्थानिक ऊंट मोहल्ला या भागात 17 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित कार्यक्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेला शिवसेना भाजप युतीचे आमदार संजय सावकारे ,माजी जिल्हाप्रमुख जगदीश कापडे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख एडव्होकेट शाम श्रीगोंदेकर ,माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी ,नगरसेवक प्रा . दिनेश राठी, दीपक धांडे, यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला .प्रसंगी शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, युवासेना शहर अधिकारी सुरज पाटील, देवा वाणी, राजू पारिख, राकेश खरारे ,उमाकांत (नमा)शर्मा ,एडव्होकेट निर्मल दायमा, सोनी ठाकूर हेमंत खंबायत ,धिरज वरढोणकर , नितेश मिश्रा ,शाहरुख पिंजारी ,लखन जगताप यांचेसह शिवसैनिक, युवासैनिक,व शिवसेनाप्रेमी नागरिकांनी व बाळासाहेबांच्या चाहत्यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले . सूत्रसंचालन मुकेश गुंजाळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.