मालदा टाउन-सुरत एक्सप्रेसला स्लीपरचे दोन अतिरीक्त डबे !

0

आसनसोल एक्स्प्रेसला अतिरीक्त वातानुकूलित बोगी

भुसावळ (प्रतिनिधी)-  मालदा टाउन-सुरत एक्स्प्रेसच्या अप – डाउन 13425/13426 य्या गाडिला  अतिरीक्त दोन स्लीपर डबे लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांची वाढती व गर्दी व होणारी गैरसोय पाहता हा निर्णय घेण्यात आला. अप 13425 मालदा टाउन-सुरत एक्स्प्रेसला 7 डिसेंबरपासून तर डाऊन 13426 सुरत-मालदा टाउन एक्सप्रेसला 9 डिसेंबरपासून प्रारंभीक स्थानकापासून अतिरीक्त दोन स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत

अप 12361 आसनसोल-मुंबई एक्सप्रेसला 1 डिसेंबरपासून एक अतिरीक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी बोगी लावण्यात येणार आहे तर डाऊन 12362 मुंबई-आसनसोल एक्स्प्रेसला 4 डिसेंबरपासून प्रस्थान स्थाकापासून एक अतिरीक्त वातानुकूलित तृतीय श्रेणी बोगी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.