बस न थाबवल्याप्रकरणी महीला वाहकाला अवाच्छ शिवीगाळ

0

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल  तालुक्यातील  आडगाव बसस्थानकावर सकाळी 9:45 वाजता भडगाव एरंडोल बस क्रमांक Mh20 Bl 1429 या बसच्या महिला वाहकास आडगाव येथील निखिल शंकर साळुंके रविंद्र नामदेव पवार भूषण रवींद्र पवार यांनी बेल मारा व बस थांबवा अशी मागणी केली असता बस न थांबवल्याचा राग आल्या मुळे महीला बस वाहकाला आडगाव बस स्थानकावर वाहक सुवर्णा अनिल सोनवणे, रविंद्र नामदेव पवार याने अश्लील व आई-बहिणीवरून शिवीगाळ केली तसेच प्रवासी मनीषा परेश चौधरी व त्यांचे पती परेश चौधरी हे समजण्यात गेले असता त्यांना वरील आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व पोटात मारहाण केली तसेच वाहकाच्या हातातील तिकीट मशीन खाली पडले व ते फुटले सदर आरोपींनी  वाहकाच्या कामात अडथळा आणला शासकीय काम करीत असताना त्यांच्या कामात अडथळा आणून अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली.याठिकाणी एसटीचे वाहक संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते वाहक व दोन प्रवासी यांची  सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वाहकाचे हातावर एका प्रवाशाच्या मानेवर जखम जखम झाली असल्याचे आढळून आले सदर आरोपी फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत असल्याचे सांगण्यात आले. सदर. कासोदा पोलीस स्टेशनला भादवि कलम 353,332,323 294,504,506 व34 नुसार गुन्हा दाखल झाला असून तपास सह पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेश ठाकरे हे तपास करीत आहेत.

बि डी बागुल स्थानक प्रमुख झालेली घटना अतिशय निंदनीय असून ज्या गावातून 100 च्या वर  विद्यार्थी अप डाऊन करतात त्या गावात असे घडणे चुकीचे आहे या आदी देखील चार वर्षापूर्वी अश्या घटना घडल्या असुन गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे त्यांच्यावर कठोर शासन व्हावे असी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.