अवैद्य वाळुचे दोन ट्रॅक्टर महसुलच्या ताब्यात !

0

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुरंगी – बांबरूड  गटात कुरंगी गिरणानदीकाठावर  महसूल प्रशासनाने जवळपास अकराशे ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला होता. मात्र महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलावाला विलंब लागल्याने त्यासाठ्यावरून मागील काही दिवसांपासून १५० ते २०० ब्रास वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे महसूल प्रशासनाच्या लक्षात आले‌ असता त्यांनी स्थानिक कोतवाल व पोलिस पाटील यांना जप्त केलेला वाळू साठ्याचे संरक्षण करण्यास सांगितले होते. दिनांक १७ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी कुरंगी कोतवाल विजय कोळी यांना माहिजी येथुन निनावी फोन आल्याने त्यांनी सोबत पोलिस पाटील यांना घेऊन घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी जेसीबीच्या साह्याने वाळू उचलत असल्याचे आढळले. यावेळी कोतवाल व पोलिस पाटील यांना पाहून जेसीबी चालकाने घटनास्थळावरून जेसीबी घेऊन पलायन केले. मात्र त्याठिकाणी असलेले दोन ट्रॅक्टर कोतवाल व पोलिस पाटील नरेंद्र गोसावी यांनी जप्त करुन महसुल प्रशासनाला खबर दिली ऐवढी मोठी चोरी सापडलेली असतांना स्वतः तहसिलदार येणे अपेक्षित असतांना तहसिलदार यांनी त्यांचे वाहन घेऊन कुरंगी तलाठी, मयूर आगरकर व दहिगाव तलाठी बहिर यांनी घटना स्थळी भेट देऊन पोलिस प्रशासनाला याबाबत खबर दिली या खबरी वरून पोलिस प्रशासनाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे सोबत किरण पाटील, सचिन पाटील व सोबत काही कर्मचारी यांच्यासमवेत वाहन चालून पाचोरा महसूल विभागात जमा करण्यात आले. व पुढील कार्यवाही करण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. एकंदरीत या घटनेवरून महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या वाळू साठ्यावर संबंधित वाळू चोराने डल्ला मारल्याने चोरावर मोर असा काहीसा प्रकार झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.