शिरसोली येथे विद्यार्थिनीची आत्महत्या

0

जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील १९ वर्षीय युवतीने घरात कोणीही नसताना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. कोमल दीपक बिऱ्हाडे (रा. आसोदा, ह. मु. शिरसोली) असे या मृत युवतीचे नाव आहे. दरम्यान, या युवतीने गळफास घेतला नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोमल बिऱ्हाडे ही आपल्या आई संगिता बिऱ्हाडे, वडिल दीपक बिऱ्हाडे आणि पाच वर्षाचा भाऊसह शिरसोली येथे राहतात. कोमल ही आयटीआय करून बारावीचे बाहेरून शिक्षण घेत होती. दरम्यान. काल  घरात कोणाही नसताना कोमलने दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान, दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घराचे दरवाजे उघडेच होते. लहान मुले पाणी पिण्यासाठी घरात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. कोमलने आत्महत्या केल्याचे समजताच संगिताबाईचे वडील व आजोबा उत्तम निकम यांनी धाव घेवून कोमलला खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी यांनी तिला मृत घोषीत केले. दरम्यान, काेमलने आत्महत्या केली नसून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.