मनसेच्या नव्या झेंड्याचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे.

मनसेचं आज पहिलं महाअधिवेशन मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान यावेळी सर्वांच्या नजरा अमित ठाकरे यांच्याबद्दल काय घोषणा होणार याकडेही आहेत. अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.