लासगावला प्रश्नमंजुषा स्पर्धा व बक्षीस वितरण संपन्न

1

पाचोरा (प्रतिनिधी) तालुकयातील लासगाव येथील एकता एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटी औरंगाबाद संचलित हाजी अ बशीर देशमुख मेमोरियल उर्दु हायस्कूल लासगाव येथे शाळेच्या दशकपूर्ती सोहळा निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा व विविध कार्यक्रमांचे बिक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. मुकीम देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा  नसीम आरा देशमुख, खलील देशमुख,  सचिव  माननिय झिशान अ.मुकीम देशमुख, अमान देशमुख, हाजी देशमुख, वहीद देशमुख, सरपंच बापु महाजन  शेख अकबर बुर्हान,  रफीक टेलर अकील देशमुख,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत.

विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातुन १००० जनरल  नॉलेजचे प्रश्न तयार करुन दिपावली च्या सुट्टी मध्ये अभ्यासा साठी देण्यात आलेले होते.त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तर विचारुन स्पर्धा घेण्यात आली व विजेता उप विजेता टीमला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.तसेच सहभागी संपूर्ण संघा ना मेडल व प्रमाणपत्र  देण्यात आले. शाळेला १० वर्षपुर्ती वर्ष सोहळा साजरा केला.व अ.मुकीम  यांना स्मुर्तीचिन्ह देऊन सोहळा साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाला गावातील ग्राम पंचायत सदस्य, वि.का.स.सोसा. सदस्य, लासगाव.बांबरुड.व कुरंगी गावातील  नागरिक उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेला विवेकानंद पाटील,रत्नराज सांळुखे, महेंद्र सांळुखे ,प्रकाश सुर्यवंशी, बाबुलाल पटेल, सैय्यद वसीम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इम्रान शेख,तर सूत्रसंचालन इम्रान देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

1 Comment
  1. Karan Jitendra Pawar says

    Kahi pan

Leave A Reply

Your email address will not be published.