शिक्षक भारतीतर्फे चाळीसगाव तालुक्यातील ३७ आदर्श शिक्षिकेंचा यथोचित गौरव

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी )शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी राज्य पातळीवर सतत पाठपुरावा करणाऱ्या आमदार कपिल पाटील यांच्या विचाराने प्रेरित शिक्षक भारती संघटनेच्या चाळीसगाव शाखेमार्फत तालुक्यातील ३७ आदर्श महिला शिक्षिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या संयुक्त जयंती दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

यात जिल्हा परिषद शाळा,प्राथमिक,माध्यमिक,आश्रमशाळा,उर्दु विभाग,विनाअनुदानित अशा सर्व विभागातील महिलांचा मानपत्र,सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला,कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सौ.स्मिता बच्छाव(अध्यक्षा युगंधरा फाऊंडेशन धुळे),श्रीमती मिनाक्षी निकम(अध्यक्षा स्वयंदिप फाऊंडेशन),कु.स्नेहा फडतरे(उपमुख्याधिकारी नगरपरिषद),डाॕ.नरेंद्र पाटील(मुंबई),विलास भोई (गटशिक्षणाधिकारी)भरत शेलार(राज्य सरचिटणीस),राजेंद्र दिघे(नाशिक विभागीय अध्यक्ष),अशोक खलाणे(संचालक-शिक्षण संस्था)नारायण वाघ(जिल्हाध्यक्ष माध्यमिक),सोमनाथ पाटील(जिल्हाध्यक्ष प्राथमिक)श्रीमती शितल जडे(महिला जिल्हाध्यक्षा),सौ.लता खलाणे(अध्यक्षा महात्मा फुले संस्था)हे होते,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विलास भोई हे होते,महिला मान्यवर अतिथींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी  स्मिता बच्छाव,मिनाक्षी निकम,स्नेहा फडतरे,विलास भोई,भरत शेलार,सोमनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई व फातिमा शेख यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा आलेख मांडला,तसेच डाॕ.नरेंद्र पाटील यांनी शिक्षक भारतीच्या सावित्री-फातिमा कॕशलेस योजने संदर्भात विस्तृत माहिती दिली,गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पुरस्कार मिळाल्यामुळे महिला शिक्षिकांची जवाबदारी वाढली असे सांगून आता अधिक चांगले काम करुन घेता येईल,असा विश्वास व्यक्त केला,राज्याचे सरचिटणीस भरत शेलार,स्मिता बच्छाव,मिनाक्षी निकम,स्नेहा फडतरे यांनी महिला शिक्षिकेंच्या चेहऱ्यावर गौरव झाल्याने जो आनंद वाहत आहे,त्याचे यश निश्चितच शिक्षक भारतीला आहे असे सांगितले,शिक्षिकांमधून मंजुषा नानकर,ज्योतिकला पाटील,अनिता मोरे,सुषमा महाजन,सुप्रिया पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन आयोजक शिक्षक भारती चाळीसगावचे मनापासून आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास घुले(प्राथमिक तालुकाध्यक्ष)तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अजिज खाटीक(माध्यमिक तालुकाध्यक्ष)यांनी केला,सुंदर असे सूत्रसंचालन उपशिक्षक भाऊलाल कुमावत यांनी तर आभारप्रदर्शन प्रोटाॕनचे तालुकाध्यक्ष हेमंत देवरे यांनी केले,यावेळी समता शिक्षक परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप,विभागिय उपाध्यक्ष रमेश सोनवणे,जळगाव कार्याध्यक्ष अजय पाटील,जळगाव तालुकाध्यक्ष पंकज पवार,प्रोटाॕन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलींद भालेराव,केंद्रप्रमुख रतिलाल जटिया,भागवत हडपे,दिलीप सावंत,सतिश सपकाळे,राठोड सर उपस्थित होते,पुरस्कारांची घोषणा  तालुकाध्यक्ष अजिज खाटीक व उपाध्यक्ष ओमप्रकाश थेटे यांनी केली,यशस्विततेसाठी प्रमुख कार्यवाह प्राचार्य अभिजित खलाणे,निलेश पाटील(कार्याध्यक्ष माध्यमिक),मनोज राजपूत(कार्याध्यक्ष प्राथमिक),उपाध्यक्ष सोपान निकम,संदिप पाटील,चंद्रकांत पाटील,ज्ञानेश्वर महाजन,गरुड सर,गुलाबराव सोनवणे,किरण महाजन,दिपक पाटील,भोसले सर,प्रफुल्ल पाटील,प्रविण सुर्यवंशी,श्रीमती प्रणाली चव्हाण,प्रकाश सुर्यवंशी,देशमुख मॕडम,पाटील मॕडम,वैशाली अहिरराव,पुष्पलता शर्मा यांनी परिश्रम घेतले.

सन्मानार्थी शिक्षिकेंची नावे

मंजुषा नानकर(व्ही.एच.पटेल विद्यालय),लता महाजन(आदर्श विद्यालय),सुजाता महाले(सर्वोद्यय विद्यालय सायगाव),छाया बैसाणे(गिरणा विद्यालय मेहुणबारे),ज्योतिकला पाटील(वाघळी विद्यालय),आशा राजपूत(राष्ट्रीय विद्यालय),सुरेखा देशमुख(हिरापूर विद्यालय),संजिवनी पाटील(बेलगंगा विद्यालय),सोनाली साळुंखे(खेडगाव विद्यालय),चंदाराणी भामरे(वलठाण आश्रम शाळा),संगिता भोसले(तळवाडे विद्यालय),शालिनी बोरसे(ज्ञानेश्वर विद्यालय),सविता पाटील(पूर्णपात्रे विद्यालय),सुनिता सोनवणे(राष्ट्रीय कन्या विद्यालय),प्रा.हेमलता शिंदे(गिरणा उच्च विद्यालय),योगिता पूरकर(खडकी आश्रम शाळा),अर्चना मोरे(देवळी आश्रम शाळा),शबनम खान(अँग्लो उर्दु हायस्कुल),अनिता राठोड(जि.प.वलठाण),अनिता मोरे(जि.प.रांजणगाव),सारिका नावरकर(जि.प.रोकडे),दिपाली सोनवणे(जि.प.तळेगाव),प्रमिला वाघ(जि.प.चितेगाव),मंदा सुर्यवंशी(जि.प.अंधारी),सुनिता देशमुख(जि.प.वाघळी),सुप्रिया पाटील(जि.प.राजदेहरे),सुषमा महाजन(जि.प.मांदुर्णे),मनिषा भामरे(जि.प.ब्राम्हणशेवगे),शैला कुंभार(जि.प.बेलगंगा),शिला खंडाळे(जि.प.दस्केबर्डी),स्वाती शिसोदे(जि.प.लोंढे),भावना ढोले(जि.प.मेहुणबारे),रोहिणी जगताप(जि.प.भवाळी),प्रतिभा साळी(जि.प.पातोंडा),शबानाबानो शेख(उर्दु पिंपरखेड),तरन्नुम नाज कुरैशी(न.पा.उर्दु),सुमन पाटील(पंचायत समिती)

Leave A Reply

Your email address will not be published.