स्व. शिक्षणमहर्षी नानासाहेब नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :दरवर्षाप्रमाणे यावर्षीही नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व  राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “स्व.  शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन दि. ७/१/२०२० गुरूवार रोजी करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मा. आण्णासाहेब एम. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगावचे अध्यक्ष मा. बापुसाहेब डॉ. एम. बी. पाटील हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी विचार मंचावर मा. दिलीप गोविंदराव देशमुख, मा. आर्की. बापुसाहेब धनंजय यशवंतराव चव्हाण, मा. भाऊसाहेब सुरेश रामचंद्र स्वार, मा. आबासाहेब सुधीर पाटील, मा. नानासाहेब अविनाश देशमुख, मा. ताईसाहेब रंजना देशमुख, मा. भाऊसाहेब विश्वास चव्हाण, मा. नानासाहेब लक्ष्मण चव्हाण, मा. बापुसाहेब शेषराव पाटील, मा. आबासाहेब बारीकराव वाघ, मा. तात्यासाहेब पंढरीनाथ निकम, मा. आबासाहेब बाळासाहेब चव्हाण, मा. भैय्यासाहेब पाटील, मा. आबासाहेब रामचंद्र जाधव, मा. सुनील देशमुख, मा. प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, मा. उपप्राचार्या डॉ. एस. व्ही. साखला, मा. उपप्राचार्या डॉ. साधना निकम, मा. प्राचार्या साधना बारवकर, इ. मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी उद्घाटनपर मनोगतात मा. आण्णासाहेब एम. के. पाटील यांनी स्व. शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, त्यांच्या नावाने सुरू केलेल्या वक्तृत्व स्पर्धा तसेच नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजतर्फे राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थीहिताच्या उपक्रमांचे कौतुक केले. नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांनी गरिब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगाव या संस्थेचा वटवृक्ष उभा करून चाळीसगाव, पाचोरा व भडगाव परिसरात ज्ञानाची गंगा आणल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. स्व. शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. तसेच, जिवनात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर वक्तृत्व कलेला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले पाहिजे असे मत त्यांनी विद्यार्थी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषण करताना मा. बापुसाहेब डॉ. एम. बी‌. पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगाव या संस्थेच्या विकासाचा लेखाजोखा थोडक्यात मांडला. तसेच, विद्यार्थीदशेतील वक्तृत्व स्पर्धेसारख्या स्पर्धांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणाचे महत्त्व त्यांनी याप्रसंगी पटवून दिले. तसेच, स्पर्धा यशस्वीतेसाठी त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. साधना निकम यांनी केले. त्यांनी याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेच्या प्रयोजनाबद्दल आणि त्या स्पर्धेचा भुतकाळातील लेखाजोखा थोडक्यात मांडला. सुत्रसंचलन प्रा. एस. पी. निकम व प्रा. शेख यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. डॉ. मनोज शितोळे यांनी केले. स्वागतगीत व ईशस्तवन कु. श्रावणी कोटस्थाने व कु. अस्लेषा अमृतकार यांनी सादर केले. याप्रसंगी, स्व. शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव चव्हाण यांचे नातू कौस्तुभ धनंजय चव्हाण यांनीही नानासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून सुमारे ३६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण महाविद्यालयातील व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व उपस्थिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.