सोनू सूद विरोधात तक्रार ; राम कदमांनी केला ‘हा’ गंभीर दावा

0

मुंबई | अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहामजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याचा आरोप सोनू सूद वर मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी यावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

कोरोना संकटाच्या काळात सोनू सूद यांनी गरीब मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केली. हे काम महाविकास आघा़डी सरकारनं करायलं हवं होतं. मात्र, ही गोष्ट सरकारला आवडली नाही,त्यामुळे बदल्याच्या भावनेतून कंगना रणौत आणि आता सोनू सूद यांच्याविरोधात कारवाई करण्यात येतीय, असं राम कदम म्हणाले. महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.