शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

0

जळगाव | प्रतिनिधी
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील वसतीगृहाच्या व जवळपास भाडयाने राहणार्‍या जवळपास 400 विद्यार्थ्यांनी एक स्तुत्य उपक्रम या वर्षा पासून सुरु केला आहे. दरवर्षी शिक्षण पूर्ण करुन आपआपल्या गावी जाणारे विद्यार्थी आपल्या खोलीतील वापरात असलेले सामान उदा. गादी, दरी, बेडशिट, उशी, पुस्तके, जुने कपडे, बादल्या, मग्गा, चप्पल, जोडे, भांडी  ,बॅग इ. साहित्य ते एकतर फेकुन देत होते अथवा येणार्‍या नविन विद्यार्थ्यांना विकून द्यायचे अशी प्रथा होती.
पण या वर्षा पासून वसतीगृहातील हेल्पींग हॅण्ड ग्रुपचे सदस्य अनिल गजभिये, मधुसुदन बिसेन, संजोग कटरे, अरिंजय फाडकुले, सागर चौरे, शैकत दास, हर्षवर्धन खंडेलवाल,तुषार जगने इ. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन समाजात समतोल राहील व गरजूंना सदर वस्तू उपलब्ध होऊन त्यांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळेल या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर सर्व सामान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतीगृहाच्या हेल्पींग हॅण्ड या ग्रुप  ने युवाशक्ती फाऊंडेशनच्या माध्यमाने शहरातील गरजूंना सदर सर्व साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
सदर साहित्य वाटपाची जबाबदारी युवाशक्ती चे संस्थापक – विराज कावडीया, बाळासाहेब नाईक, सी.ए. संकेत छाजेड, मनजित जांगीड,संदिप कासार, नवल गोपाल, संदिप सुर्यवंशी, जयेश पवार, सागर सोनवणे यांनी स्वीकारली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.