मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून रोहिणी परिसरात चारा छावनी सुरू

0

मुक्या प्राण्यांसाठी केलेली पुण्याई
चाळीसगाव | प्रतिनिधी
 प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक श्री मंगेशदादा चव्हाण यांच्या सौजन्याने चारा छावणी सावली शेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागे रोहिणी तालुका- चाळीसगाव येथे करण्यात आले. या ठिकाणी दुष्काळामुळे गुरांना पिण्यासाठी पाण्याचा सिमेंट हौद तयार करण्यात आला. पंचक्रोशीतील ग्रामस्थानी याकामी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आज प्रायोगिक तत्वावर या छावणीला सुरुवात करण्यात आली व गुरांना कुटी मशिन च्या साहयाने ऊसाची कुटी करून प्रत्येक जनावराला चारा वाटप करण्यात आला.सावली, पाणी आणि ऊसाची कुटी अश्या सुविधा उद्योगपती   श्री मंगेश दादा चव्हाण यांनी उपलब्ध करून दिल्या मुले पंचक्रोशीतील शेतकरी बंधूनी दादांचे  मनःपूर्वक आभार मानले व समाधान व्यक्त केले. अत्यंत कडक उन्हाळ्यात जनावरांची चाऱ्यासाठी व पाण्यासाठी होणारी वणवण पाहिल्यानंतर मन हेलावून जाते या संपूर्ण परिसरात पाण्याची भीषण टंचाई असल्याने माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही तर जनावरांना चारा आणि पाणी ही फार दुर्मिळ गोष्ट झाली आहे अशा परिस्थितीत मुक्या प्राण्यांचा विचार करून मंगेश दादा चव्हाण यांनी केलेली ही सोय म्हणजे अत्यंत पुण्याचे का म्हणता येईल आज श्री मंगेश दादा चव्हाण यांनी चारा छावणीला भेट दिली त्याप्रसंगी चे काही क्षण चित्र…

 

Leave A Reply

Your email address will not be published.