भडगावातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

0

भडगाव  | प्रतिनिधी
तालुक्यात दोन अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या घटना उघड झाल्या असून या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनत गुन्हा दाखल करण्यात आला.
भडगाव तालुक्यातील भातखंडे  येथील १७  वर्षीय मुलीस तर भडगावातील 16 वर्षीय मुलीस आई वडीलांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून कुणीतरी पळवून नेले आहे.
भातखंडे येथील फिर्यादी संगिताबाई राजु जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी नळाला पाणी आले असून पाणी भरल्यानंतर घरातील कामे करत असतांना चंदू खरे हा घरात आला व काही वेळाने घरातून गेला तेव्हा मुलगी घरात आढळली नाही. मैत्रीणीकडे तपास केला असता तेथेही ती नव्हती. चंदूला फोन केला तर त्यानी सांगितले की तुमची मुलगी मी नाशिकला घेऊन आलो आहे. चंदु खरे हा पाचोरा तालुक्यातील कासमपुराचा रहिवासी आहे. भडगाव येथील 16 वर्षीय मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आई वडीलांच्या रखवालीतून फूस लावून पळून नेल्याप्रकरणी गुलाब बाबुराव माळी यांनी फिर्याद दिली आहे.या दोन्ही घटना प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.