शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमध्ये दिलासा

0

कोविड-19 च्या संसर्गामुळे सध्याची परिस्थिती पाहता सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत किंव्हा 50 टक्के त्यात सूट देण्याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी  महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव व प्रतिनिधी भारत (संयुक्त राष्ट्र वैश्विक घटक) रोहित काळे यांच्याशी संपर्क साधून त्यांची समस्या व्यक्त केली , विषयाची गंभीरता लक्षात घेता लगेच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून तात्काळ प्राचार्य महोदयांशी प्राथमिक चर्चा केली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यास खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते, सध्याची कोविद-19 ची परिस्थिती पाहता इतके परीक्षा शुल्क भरणे विद्यार्थ्यांना शक्य नाही, सर्व विद्यार्थ्यांची मागणी ही होती की त्वरित परीक्षा शुल्क माफ करा अन्यथा त्या मध्ये 50 टक्के सूट द्या. जिल्हा सचिव रोहित काळे यांनी परीक्षा यंत्रणेचा अभ्यास केला असता असे ही लक्षात आले की कागद,पेपर प्रिंटिंग,हॉल व बेंचेस नंतर ते पेपर सोडवून झाल्यावर तपासणी साठी व निकाल लावणारे असे खूप मोठे मनुष्यबळ हे सगळं infrastructure उभं करण्यासाठी खर्च ही खूप व्हायचा पण आता तो सगळा खर्च थांबून site वर questions टाकल्यावर automatically तो चेक होऊन फक्त निकाल जाहीर करूण इतकी सोपी पद्धती तयार झाली तरी हा जो अतिरिक्त खर्च होत होता आता तो वगळून आपण आमची exam फीस ही 50% करावी ही विनंती एक्साम फीस भरल्यावर विद्यार्थ्याला नेट चा ही खर्च करावा लागतोच हा ही विचार करावा म्हणून विद्यार्थ्यांची एक्साम फीस ही अर्धी करावी किंवा सरसकट माफच करावी ही विनंती  महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव व प्रतिनिधी भारत (संयुक्त राष्ट्र वैश्विक घटक) रोहित काळे आणि सोबत जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी प्राचार्य महोदय यांच्याकळे केली.

कारण कोरोनाचा महामारीत विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही खराब असून याचा विचार करावा असे देखील रोहन महाजन यांनी प्राचार्य यांना सांगितले.

सदर ची परिस्थिती पाहता वालचंद सांगली मध्ये जून मध्ये होण्याऱ्या परीक्षेचे शुल्क माफ करण्यात आले आहे , आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद , शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे देखील परीक्षा शुल्क मध्ये सूट देण्यात आली आहे ,तरी विद्यार्थ्यांची  मागणी आहे की परीक्षा शुल्क माफ करावे आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सचिव  यांनी पत्रा द्वारे प्राचार्य महोदयांकळे सोमवारी सकाळी केली असता त्यांच्याशी दूरध्वनीवरून वरून चर्चा सुध्दा केली.

लगेचच 3 तासाच्या आत प्राचार्य महोदयांनी 12 वाजता बैठक बोलवत  25 % टक्के परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आणि प्राचार्य यांनी 50% टक्के कमी करण्याचा प्रस्ताव मांडला पण काही प्राध्यापक लिकांचे बोलणे झाले की परीक्षेला लागता खरच बगता त्यावर पुढे 50% कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो असे सांगितले सध्या विद्यार्थ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला.

सध्या 25% चा निर्णय झाला आहे प्राचार्य सरांनी 50% कमी करण्याची भूमिका दर्शवली ,पण काही प्राध्यापक लोकांचे बोलणे झाले की सध्या 25% चा निर्णय घेऊ आणि लागत असलेल्या खर्चाचा विचार करून 50% चा निर्णय हा पुढे घेण्याचा विचार – प्रभारी प्राचार्य डॉ. देवेंद्र चौधरी

Leave A Reply

Your email address will not be published.