पाणी टंचाई निवारणार्थ 40 विंधन विहीरी मंजूर

0

बुलडाणा : पाणीटंचाई निवारणार्थ बुलडाणा तालुक्यातील 25 गावांमधील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा भाग म्हणून विंधन विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे.   विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे. गावाच्या लोकसंख्येनुसार विंधन विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे.

विंधन विहीरी मंजूर करण्यात आलेली सर्व गावे बुलडाणा तालुक्यातील आहे. गावे व मंजूर विंधन विहीरी :  मौंढाळा 1 विंधन विहीर, साखळी बु 2 विंधन विहीर, भादोला 2 विंधन विहीर, देऊळघाट 3 विंधन विहीर, माळविहीर 1 विंधन विहीर, सव 2, तांदुळवाडी 1, उमाळा 1, येळगांव 1, सुंदरखेड 3, इरला 1, भडगांव 1, ढासाळवाडी 1, पिं. सराई 2, सैलानी 2, गुम्मी 2, धाड 2, दुधा 1, चिखला 1, रायपूर 2, अंभोडा 1, घाटनांद्रा 1, पाडळी 2,डोंगरखंडाळा 3 व मासरूळ गावासाठी 1 विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण 40 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.