दधम येथे जलशुध्दीकरण प्रकल्प उभारावा -नाना कोकरे

0

खामगाव(प्रतिनिधी) खामगाव तालुक्यातील खारपान पट्टयात येणार्‍या दधम या गावात जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, खामगाव तालुक्यातील मौजे दधम हे गाव खारपान पट्ट्यात येत असून या गावाला अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.  त्यामुळे किडणीसोबतच जलजन्य आजाराने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा करणे सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. तरी मौजे धदम येथील पिण्याचे पाणी पुरवठा योजनेवर जलशुध्दीकरण केंद्र (फिल्टर प्लांट) उभारण्याबाबत ग्रामीण विकास व जल पुरवठा विभागास त्वरित आदेश देण्यात येवून ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी पुरविण्यात यावे अशी विनंती निवेदनात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.