नकली सोन्याच्या नाणी देऊन फसवणूक करणार्‍या टोळीतील आणखी दोघे अटक, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त

0

खामगाव (प्रतिनिधी)- नकली सोन्याची नाणी देऊन फसवणूक करणार्‍या टोळीतील आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 3 लाख 13 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणार्‍या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणार्‍या टोळीला मागील गुरुवारी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी पहाटे अंत्रज, हिवरखेड, रोहणा, कंझारा या भागातील जंगलात कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात आणखी दोन जण ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. शस्त्रसाठा, मोबाईल, नकली सोने चांदी असा 3 लाख 13 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक देशी पिस्तूल, नकली सोन्याच्या गिन्या, मोबाईल, तलवारी व मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. 20 अधिकारी, दोन आरसीबी पथक, 50 अंमलदार असा मोठा ताफा घेवून ही कारवाई करण्यात आली. या टोळीने 5 मे रोजी पुणे येथील दोन व्यवसायिकाची अशीच फसवणूक केली गेली. याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी अंत्रज येथे कोंबींग आपरेशन राबविले. या धडक कारवाईत टोळीतील 15 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून दोन देशी कटे, मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.