अनिलभाऊ नावंदर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

0

खामगाव (गणेश भेरडे)- महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस 11 मे रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीस नेते, केमिस्ट बांधव व चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून तसेच भ्रमणध्वनीव्दारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व सौ. अलकादेवी सानंदा यांनी निवासस्थानी भेट देऊन अनिलभाऊंना शुभेच्छा दिल्या. तसेच नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित दैनिक लोकशाहीच्या अभिष्टचिंतन विशेषांकाचे अवलोकन करून कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.