वीजेचा शॉक लागल्याने पतीचा मृत्यू ; पत्नी जखमी

0

भुसावळ –

वीजेचा प्रवाह येऊन शॉक लागल्याने पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी झाल्याची घटना आज दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ७-४५वाजेदरम्यान घडली.
स्थानिक पंधरा बंगला जलाल शाह बाबा दरगा जवळील झोपडीतील रहिवासी ज्योती रविंद्र नन्नवरे (वय ३८) ह्या आज दि.३० रोजी सकाळी कपडे धुऊन तारांवर टाकत असतांना अचानक त्यात वीजप्रवाह आला. पत्नीला शॉक लागत असल्याचे पाहून रिक्षाचालक पती रविंद्र रामदास नन्नवरे (वय ४५) यांनी धाव घेत पत्नीला ओढून एका बाजूला केले मात्र वीज तारांना स्पर्श झाल्याने रविंद्र नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी ज्योती ही भाजली असून त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले.
मयत रविंद्र नन्नवरे यांची विवाहीत मुलगी पुजा ही रक्षा बंधनानिमित्त आज चोपड्याहून येणार होती. त्यांना मुलगा मयुर व मुलगी पुनम असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.