पारोळ्यात शॉर्टसर्किटने घराला आग : लहान कुंभार वाडयातील घटना

0
पारोळा-
येथील लहान कुंभार वाडयालगत असलेल्या घरामध्ये पठाण कुटूबीय पहाटे साखर झोपेत असतांना दिनांक 30 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक शॉटसार्किट झाल्यामुळे आग लागून घरातील , संसार उपयोगी वस्तुसह रोख ४ लाख असे एकूण ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
सुलतान खॉ रमजान खॉ पठाण व हुसेन खाँ रमजान खॉ पठाण यांचे लहान कुंभार वाडया लगत बाजुने सिमेंटचे आत मध्ये मातिचे घर आहे या घरामध्ये पाच भावांचे कुटुंबीय राहत असुन फ्रुटचा व्यवसाय करतात दिनांक 30 ऑगस्ट रोजी मध्यरात्री हे कुटूंबीय साखर झोपेत असतांना दिड  वाजेच्या सुमारास घराला शॉर्टी सर्किट ने अचानक आग लागली घरात धुर जमू लागल्याने . घरातील कुटुंबीय बाहेर पळाले हा …. हा … म्हणता आगीने रुद्ररूप धारण केले अचानक लागलेल्या आगी मुळे पठाण कुटूंबीय सैरावैरा झाले . आगीचे लोळ सर्वत्र दिसत असतांना नगरसेवक कैलास आंनदा चौधरी यांनी ताबडतोब अग्नीशामक बंब मागविला तो पर्यंत कैलास चौधरी,हारुण शेख अहमद,विजय कुभार,पिंटु चौधरी , अहमद रवालीद शेख बाबु , मुस्ताक शेख अशरफ,अमजद शेख मुसिद आदि सह परिसरातील नागरीकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले या आगीत घरातील अन्न – धान्य , कपडे , फ्रुट व्यापाऱ्याला देण्यासाठी ठेवलेले चार लाख रुपये रोख , पत्री कपाटात ठेवलेले सोने – चांदीचे दांगिने , संसार उपयोगी वस्तु असे एकूण सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे . नुकसानीचे पंचनामा तलाठी निशिकांत पाटील   यानी केला. कुटूंबीयांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे .
     व्यांपाऱ्यांना द्यावयाचे होते पैसे ……
सुलतान खॉ रमजान खॉ पठाण व हुसेन खॉ रमजान खॉ पठाण यांचे सहा भांवडाचे कुंटूबीय असुन शहरातील ठिकठिकणच्या पॉईड वर हातगाडीवर फ्रुटचा व्यवसाय करतात दोन – तीन व्यापाऱ्यांना चार लाख रुपयांची वाटप करावयाची असल्याने पैश्याची जमवा – जमव करून पत्री कपाटात चार लाख रोख स्वरूपात ठेवले होते ते ही आगीत जळून खाक झाल्याने त्यांनी .एकच अक्रोश केला होता.यावेळी आग विझवीत असतांना शेख हारून शेख अहमद हे जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.