विमा कंपनीचे देश विकासात मोठे योगदान – श्रीकांत नेवे

0
चोपडा –
विमा संरक्षणामुळे अचानक संकट कोसळलेल्या घरांना मोठा आधार प्राप्त झाला आहे.भारतीय विमा निगमच्या दर पंचवार्षिक मध्ये दिलेल्या मोठ्या आर्थिक योगदानामुळे देशात विकास कामे उभी राहू शकली.अब्जावधी रूपयांचा व्यवहार करणारी एल.आय.सी.देशाच्या सर्व नागरिकांना आपली सुविधा पुरवू शकेल इतपत मोठी झाली पाहिजे. त्यासाठी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी प्रिमियम असलेल्या नवनव्या योजना अाणून विमा अगदी शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्याचा प्रयास केल्याचे प्रतिपादन पत्रकार श्रीकांत नेवे यांनी केले.
चोपड्यातील भारतीय जीवन बिमा निगमच्या कार्यालयात कंपनीच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी चोपडा शाखेचे प्रबंधक एस.एन.धोपेकर होते.प्रारंभी श्री लक्ष्मी मातेच्या प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.एल.आय.सी.च्या कर्मचाऱ्यांना विमा विकासासाठी कटिबध्द राहण्याची शपथ देण्यात आली त्याचे वाचन राजेंद्र नेवे यांनी केले. प्रास्तविक धोपेकर यांनी करतांना एल.आय. सी.च्या कार्याचा आढावा घेतला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी एस.इ.घुले,निवृत्त अधिकारी सुभाष पाटील होते.अतिथींचा सत्कार स्थानिक शाखेच्या अधिका-यांनी केला.यावेळी प्रमुख पाहुणे घुले, सुभाष पाटील,अरुण साळुंखे, ग्राहक प्रतिनिधी प्रा.पी.बी.चौधरी,विमा विकास अधिकारी प्रकाश कासार,एजंट महेंद्र सोनवणे,महेश कुलकर्णी यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगिता अजनाडकर यांनी केले.तर आभार राजेंद्र नेवे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.