बोहरा सेंट्रल स्कूलच्या विदयार्थीनी गोपाल-गोपिंकांनी साजरा केला जल्लोषात दहिहंडी चा उत्‍़सव

0
पारोळा-
श्रीकृष्णाचे जन्‍़मोत्‍़सवाचे औचित्य साधून बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये जन्माष्टमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दरवर्षाप्रमाणे यावर्षी प्रि-प्रायमरी वर्गातील नर्सरी एलकेजीयुजी या वर्गातील विद्यार्थ्यांना राधा-कृष्णच्या  वेशभूषेत बोलावण्यात आले होते. छोट्या-छोट्या बाल-गोपिकांनी राधाकृष्णची वेशभूषा परिधान करुन संबंध वातावरण नंदग्राम सारखे दिसते होते.
कार्यक्रमाची सुरुवात कु. सोनम बोहरा, यांच्या हस्ते श्रीकृष्‍़ण-राधा मूर्तिपूजनाने करण्यात आली. तसेच तसेच सोनम बोहरा यांच्या हस्ते दाहिहंडी प्रतियोगितेच्या हंडीचे पूजनही करण्यात आले. सदर क्रार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री. सुरेंद्रजी बोहरा, कु.सोनम बोहरा, तसेच पालकवृंद गजरे सर, सौ. अविता पाटील, सौ. प्रितम पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची मनोरंजन क्रार्यक्रमात इ.7वीच्या विद्यार्थींनीनी गीते गायिली. तसेच श्रीकृष्‍़ण लीलांवर आधरित इ.6वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्येसादर केली. त्यानंतर इ. 9वी व 10वीच्या विद्याथी व विद्यार्थ्यानी साठी ‘दहीहंडी’  प्रतियोगिता आयोजित करण्यात आली होती. सदर दहीहंडी गोपाल-गोपिकांचे सौ. अविता पाटील यांच्याकडून औक्षण करण्यात आले. मुलींमध्ये इ.9वीच्या साक्षी पाटील व चेतश्री बोरसे इ.10वीच्या यतिन थोरात, रूतिक ठाकरे (इ.9वी) यशपाल गिरासे (इ.10वी) या गटनायकांनी दहिहंडी फोडली. सर्व शालेय विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमांचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे नियोजक कु.स्वाती बालखंडे नैना कुलकर्णी, क्रीडा प्रशिक्षक सत्यनारायण पवार, गणेश काटकर, रविंद्र गजरेसर, अविता पाटील, प्रितम पाटील तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.