मुंबई नंतर सर्वात मोठी दहीहंडी उत्सव पाचोऱ्यात*

0
  पाचोरा –
पाचोरा येथे दिनांक ३ सप्टेबर २०१८ रोजी भाजपाचे युवा नेते अमोल शिंदे यांचे संकल्पनेतून मुंबई नंतर सर्वात भव्य दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुंबई येथून ३५० युवकांचे गोविंदा पथक येणार असून हे पथक आठ स्थरांची सलामी देणार आहेत. उत्सवात प्रशिद्ध साई गर्जना ढोल पथक सादरीकरण करणार असुन नेत्रदीपक असा लाईटिंग शो, डी.आय.डी. लिटल चॅम्पियन यांचा घमाकेदार डान्स, फटाक्यानच्या आतीष बाजीत चार थर लावणाऱ्यास पथकास विषेश पारीतोषीक देण्यात येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता राजे संभाजी महाराज चौक येथे होणाऱ्या दहीहंडी उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन अमोल शिंदे व पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. युवा नेते अमोल शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांपासून गणेश उत्सवात कापसापासून गणेश मूर्ती, भव्य अशी रांगोळी काढून गणेशाचे दर्शन,सप्त धान्यापासून गणेशमूर्ती, काठ्या व लाकडांपासुन गणेश मूर्ती बनवून पाचोरा भडगाव वाशियांचेच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गणेश भक्तांसाठी एक वेगळे आकर्षण निर्माण केले आहे. व आता गेल्या दोन वर्षांपासून गोपालांसाठी दहीहंडी उत्सव साजरा करुन तालुका वाशीयांचे मनोरंजनाचे काम सुरू केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.