विदर्भात कोरोनाचा दुसरा बळी ; राज्यात मृतांचा आकडा २१ वर

0

अमरावती: राज्यातही कोरोना रुग्णांच्या मृतांच्या संख्यमध्ये वाढ झाली आहे. अमरावतीमध्येही कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. अमरावती शहरातील एका इसमाचा कोरोणाने मृत्यू झाला. त्यामुळे आता राज्यात कोरोना मृतांची संख्या २१ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत 17, मुंबई उपनगरात 1, पुण्यात 1, बुलढाणा 1, अमरावतीमध्ये 1 असा मृत्यू झाला आहे.

या ४५ वर्षीय व्यक्तीला २ एप्रिल रोजी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोनाची लक्षणं आढळल्याने त्याच्यावर तात्काळ उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला न्यूमोनिया झाल्याचं निदान केलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याच दिवशी सकाळी साडे नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला होता. आज पहाटे ३ वाजता त्याच्या करोना टेस्टचा अहवाल आला असून त्यात त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तो राहत असलेला हत्तीपुरा परिसर सील केला आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या शिवाय तो आणि त्यांचे कुटुंबीय ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले होते, त्यांचाही शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.