जळगावात एकाच दिवशी चार ठिकाणी चोरट्यांनी मारला डल्ला ; हजारोंचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव :  शहरात एकाच दिवशी चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत हजारोंचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली. ही घटना पहाटे उघडकीस आली असून यात रामननगरात तीन ठिकाणी तर पिंप्राळ्यात एका ठिकाणी चोरी झाली आहे.

आधीच कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.  राज्य सरकार कडूनही संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश जाहीर करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन करणाºया रहिवासीयांवर कडक कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे.  त्यामुळे सर्व नागरिक घरात बसून आहे. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. रस्ते आणि सोसायटी परिसर निर्मनुष्य असल्यामुळे, चोरट्यांनी चोरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याच संधीचा फायदा घेत शहरातील रामननगरात तीन ठिकाणी तर पिंप्राळ्यात एका ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.

यात शहरातील रामनगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास असलेले अमीन पटेल यांचे किरणा दुकानातील  सुमारे नऊ ते दहा हजार रूपयांचे साबण तसेच इतर किरणा साहित्य चोरीला गेल्याचे पाहणीत आढळून आले़ आहे.  तर अमीन पटेल यांच्या खालच्या मजल्यावर राहत असलेले रिक्षाचालक अमीन पठाण यांच्या घरातून चोरट्यांनी सहा हजार रूपयांची रोकड, तीस ते चाळीस हजारांचे चांदीचे दागिने तर अमीन पठाण यांच्या शेजारी राहत असलेले रज्जाक देशमुख हे सुध्दा गावी गेल्यामुळे त्यांचे घर कुलूप बंद होते़. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी देशमुख यांच्या घरातून रोख ५ हजार रूपये व १० हजार रूपयांचे चांदीचे दागिने लंपास केल्याचे आढळून आले़. याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यात आली आह. एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता  त्यात चोरटे दिसून आले आहे़ त्यानुसार फुटेज ताब्यात घेत पोलीस चोरट्याच्या शोधार्थ आहे़.

याचबरोबर पिंप्राळ्यात असलेल्या सोमाणी मार्केटमधील एक दुकान फोडून ४३ हजार रूपये किंमतीची साऊंड सिस्टिम चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघड झाली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पिंप्राळा येथे प्रयास मित्र मंडळ आहे़ चंद्रकांत महाजन यांच्या मालकीचे सोमाणी मार्केटमधील दुकान हे या मंडळाने भाड्याने घेतले आहे़.

Leave A Reply

Your email address will not be published.