विज्ञानगाव कल्याणेहोळ येथे नोबेल ग्रामीण प्रज्ञाशोध परीक्षा संपन

0

जळगाव दि. 1 :
आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपाला आलेले देशातील पहिले विज्ञानगाव कल्याणेहोळ येथे नुकतीच नोबेल प्रज्ञाशोध ग्रामीण परीक्षा, नोबेल फाउंडेशन जळगाव व ग्रामपंचायत कल्याणेहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडली .
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी तसेच संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षा डॉ एपीजे कलाम बाल विज्ञान संस्कार केंद्र कल्यानणेहोळ ,पी आर हायस्कूल धरणगाव व अंजनी माध्यमिक विद्यालय हिंगोणे बु या तीन केंद्रांवर रविवार दि. 30 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत संप्पन झाली. तब्बल 800 विद्यार्थ्यांनी परीक्षेत आपला सहभाग नोंदवला .
दोन गटात घेण्यात आली परीक्षा :नोबेल प्रज्ञाशोध ग्रामीण परीक्षा , इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत घेण्यात आली. सदर परीक्षा गणित,विज्ञान, आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित होती.
सुप्रसिद्ध लेखिका दिपा देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण-
यशस्वी विद्यार्थ्यांना दि. 6 जानेवारी रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृह ला.ना.हायस्कूल जळगाव येथे होणार्‍या कार्यक्रमात, अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या भारतीय जिनियस,तंत्रज्ञ जिनियस या पुस्तकाचे संच तसेच वैज्ञानिक साहित्य भेट दिले जाणार आहे. विशेष म्हणजे खुद्द या पुस्तकांच्या लेखिका दीपा देशमुख यांच्या हस्ते बक्षिस वितरण केले जाणार आहे.
800 विद्यार्थ्यांचा सहभाग
अशा स्वरूपाची विज्ञान विषयाची ग्रामीण प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात पहिल्यांदाच घेण्यात आली. सदर प्रज्ञाशोध परीक्षेस विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील तब्बल 800 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामुळे खेड्यांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागण्यास मदत होणार आहे .परीक्षेवेळी धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एन.चौधरी , उपमुख्याध्यापक संजय अमृतकर पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे , यांनी भेट दिली. यावेळी शाळेतील शिक्षक एस.के.बेलदार , डी.के.चौधरी , सुरेंद्र सोनार, वंदना सोनवणे, गोपाळ सोनवणे , प्रशांत महाजन , उमाकांत बोरसे व इतर कर्मचारी उपस्थित होते. तर कल्याणेहोळ ता.धरणगाव येथे सरपंच रमेश पाटील , उपसरपंच अजेंद्र पाटील मुख्याध्यापिका संगिता कोळेकर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
पगरिया ऑटो जळगाव, दीपस्तंभ फाउंडेशनचे सहकार्य लाभले. नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. जयदिप पाटील , संचालक प्रा. विशाल पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.