महिला मंडळ शाळेतील विद्यार्थ्यांची चोपडा नगरपालिकेस क्षेत्रभेट

0

चोपडा दि.1
येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल, चोपडा येथील इ. 4थीच्या विद्यार्थ्यांनी नगरपालिका चोपडा येथे क्षेत्र भेट दिली.
क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, लेखा विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, कर वसुली विभाग, रस्ते व पथदिवे विभाग, संगणक कक्ष व ऑनलाइन प्रणाली आदी विभागांची माहिती मिळवली. तसेच मुख्याधिकारी दालन, नगराध्यक्ष दालन, उपनगराध्यक्ष दालन, सभागृह इत्यादी सुसज्ज व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा दालनांची प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण संदानशिव व शिक्षक सौ. दिपाली धनगर, जितेंद्र जोशी, हर्षल वाघ व नगरपालिकेतील विविध कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांना नगरपालिकेचे कामकाज कसे चालते तसेच नगरपालिकेतील विविध विभाग इत्यादींची माहिती दिली. विद्यार्थ्यांना कर वसुली व त्यातून होणार्‍या विकास कामांची माहिती मिळाली तसेच स्वच्छ भारत अभियानाविषयी नगरपालिकेचे उद्दिष्ट काय व नगरपालिकेमार्फत स्वच्छतेचे कोणते कार्यक्रम राबवले जातात या विषयी माहिती देण्यात आली. चोपडा नगरीच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा माळी यांनी विद्यार्थ्यांना गोड खाऊ उपलब्ध करून दिला तसेच विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनम गुजराथी, सहसचिव सौ. अश्विनी गुजराथी व प्रा. आशिष गुजराथी यांनी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.