वाहनाच्या धडकेत शेतकर्‍याचा मृत्यू; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी अज्ञात चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव पाचोरा रोडवर पन्नालाल लाडवंजारी यांच्या शेतासमोरील रस्त्यावर भिका कडू महाजन रा. टाकरखेडा ता. यावल हे २ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. यादरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात भिका महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी संताजी पंडीत लाडवंजारी (वय ४६ रा. मेहरुण जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.