दारुड्या पतीची पत्नीला मारहाण; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील ४० वर्षीय विवाहातीला दारुच्या नशेत पतीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगिता रमेश झेंडे (वय ४०, रा. राजीव गांधीनगर) या कुटूंबीयांसह राहतात. त्याचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हा काल संध्याकाळी दारुच्या नशेत घरी येवून काहीच कारण नसतांना वाद घालून पत्नी संगिताला लोखंडी पट्टीने खांद्यावर, डाव्या बरगडीवर, मनगटावर मारहाण करीत जखमी करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी संगीत झेंडे यांच्या तक्रारीवरुन संशयीत पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटील करत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.