वाघाने केली वासराची शिकार; परिसरात भीतीचे वातावरण

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्थानिक सुटाळपुरा केशवनगर भागातील गाडगेबाबा मंदिराजवळ 4 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास दिसलेल्या वाघाचा अजुनही शहर व परिसरात संचार सुरू असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी शिवाजी येस ते गौरक्षण रोडवर एका वासराची शिकार एका वन्य प्राण्याने केली आहे, त्यामुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

शहर व परिसरात 4 डिसेंबर पासून वाघाच्या मुक्त संचाराबाबतच चर्चा होत आहे. नागरिकांनी वाघाची धास्ती घेतली असून चर्चेत वाघाला पकडण्यात वन विभागाला यश आले काय? याबाबत नागरिकांत जागोजागी चर्चा होत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी या प्रकरण उचलून धरले आहे. मुक्त संचार करीत असलेल्या वाघाची भीती कमी होत असतानाच अचानक आज 7 डिसेंबर रोजी सकाळी गौरक्षण रोडवरील निर्मळ जोशी यांच्या घराजवळील गोठ्यातील एका 15 तासाच्या नवजात वासरावर अचानक प्राण्याने हल्ला केला होता. त्यात वासराचा मृत्यू झाला.

ही बाब सकाळी 6 वाजताच्या सुमारास निर्मळ जोशी हे नवजात यासराला पाहण्यासाठी गेले असता उघडकीस आली. प्राण्याने वासराच्या पोटाकडील मध्यभाग पूर्णपणे खाल्ला आहे. त्यामुळे हिंसा प्राण्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून वाघानेच वासराची शिकार केल्याची चर्चा नागरिकात होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

यावेळी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे वन्यप्राण्याच्या (वाघाच्या) पायाचे ठसे दिसून आले. तसेच घटनास्थळाच्या म्हणजेच गोठ्याच्या बाजूने शेत असल्यामुळे वाघाने वासराची शिकार केल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान अमरावती येथून आलेल्या वैद्यकीय पथकाने मृत वासराचे विच्छेदन केले आहे. मात्र वन विभागाने वाघाने वासराची शिकार केली असल्याबाबत अधिकृत माहिती सांगण्यास नकार दिला. तर या घटनेमुळे शिवाजी वेस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.