वस्तु खरेदी करतांना काळजी घ्यावी ; तहसिलदार अमोल मोरे

0

चाळीसगाव | प्रतिनिधी
वस्तु खरेदी करतांना त्या वस्तुच्या वापराचे ज्ञान असणे आवश्यक असते. वस्तु वापराचे ज्ञान नसल्याने आपली फसवणूक होवू शकते. फसवणूक टाळण्यासाठी वस्तु खरेदी करतांना त्या वस्तुंचे ज्ञान आवश्यक असते असे तहसिलदार अमोल मोरे यांनी सांगितले.
15 मार्च, 2019 या जागतिक ग्राहक दिनानिमित्त येथील तहसिल कार्यालयात ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नायब तहसिलदार विशाल सोनवणे, पुरवठा निरिक्षक संदेश निकुंभ, ग्राहक पंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते.
तहसिलदार श्री. मोरे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने या जागतिक ग्राहक दिनाची Trusted Smart Products ही संकल्पना दिली आहे. ऑन लाईन व्यवहार करतांना आपण जी साधणे वापरतो ती सर्व स्मार्ट प्रोडक्टसमध्ये येतात. या वस्तु खरेदी करतांना त्याच्या वापरण्याचे ज्ञान आपणास असायला पाहिजे. अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. कोणत्याही वस्तुंची गुणवत्ता ही त्याच्या सेवा देण्यावर ठरत असते. वस्तु खरेदी केल्यावर ती सेवा देत नसेल तर त्या वस्तु पुरवठादार किंवा कंपनी विरुध्द आपणास तक्रार दाखल करता येते. कोणतीही वस्तु खरेदी करतांना ती तपासून घेतली तर आपली फसवणूक होणार नाही.
आपल्या प्रास्तविकात नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी सांगितले, मणुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ग्राहक असतो. दैनंदिन व्यवहार करतांना आपण ग्राहक असतो. अशावेळी वस्तु खरेदी करतांना किंवा सेवा घेतांना आपली फसवणूक होवू नये यासाठी ती तपासून घेतली पाहिजे. तरीही आपली फवणूक झाली तर ग्राहक मंचाकडे दाद मागता येते. ग्राहक हक्क व ग्राहकांचे प्रबोधन व्हावे यासाठी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमात गॅस सिलेंडर घरपोच देतांना पावतीपेक्षा जास्त पैसे घेतले जातात. असे विविध तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी ग्राहक पंचायतीचे अण्णा धुमाळ, खुशाल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पुरवठा निरीक्षक संदेश निकुंभ यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात ग्राहक पंचायतीचे सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.