धरणगाव येथे अखंड हरीनाम कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

0

रणगाव:- सालाबादा प्रमाणे ह्या वर्षी ही येथील समस्त पाटील समाज पंच मंडळ, लहान माळी वाडा येथे कै.शंकर विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र शंकर पाटील यांच्या कडून अखंड हरीनाम किर्तन सप्ताह तर अर्जून किसन पाटील यांच्या कडून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पारायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.१५/३/२०१९ वार शुक्रवार रोजी गाथा पारायण सुरू झाले.

यावेळी ह.भ.प. संजय महाराज जळगावकर यांनी गाथा पारायण व्यासपीठावर गाथेचे वाचन सुरू केले.समस्त पाटील समाज पंच मंडळ , लहान माळी वाडा चे अध्यक्ष भिमराज अर्जून पाटील यांनी सपत्निक गाथा पूजन केले.गाथा पारायणाची वेळ सकाळी – ९ ते ११ व दुपारी ३ ते ५ अशी आहे.जिल्ह्याभरात सामूहिक गाथा पारायण करण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे हे ३ रे वर्ष आहे.जवळपास २५ ते ३० भाविक बंधू बघिणी यात सहभागी झाले आहेत.कार्यक्रमाला समस्त पाटील समाज पंच मंडळ , समस्त माळी समाज पंच मंडळ , समस्त चौधरी समाज पंच मंडळ , समस्त मराठे समाज पंच मंडळ यांचे सर्व संचालक मंडळ तसेच लहान माळी वाडा परिसरातील भाविक बंधू बघिणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अतिशय सुंदर असे नियोजन व भक्तिमय वातावरणात पांडुरंगाच्या नामस्मरणाने परिसरात नवचैतन्य पहायला मिळते.सायंकाळी ५ ते ६ या वेळात हरिपाठ वाचन व नंतर आरती होईल.रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल.दि.१५/३/२०१९ शुक्रवार ते २२/३/२०१९ शुक्रवार पर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामांकित किर्तनकार सहभागी होणार असून त्यात दि. १५/३/२०१९ शुक्रवार रोजी ह.भ.प.माधवराव महाराज धानोरा , दि. १६/३/२०१९ शनिवार रोजी ह.भ.प.गुलाबराव महाराज लोण, दि.१७/३/२०१९ रविवार रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज जोगलखेडेकर, दि.१८/३/२०१९ सोमवार रोजी ह.भ.प.लिलाधर महाराज ओझरकर, दि.१९/३/२०१९ मंगळवार रोजी ह.भ.प. किशोर महाराज सोनखेडीकर, दि.२०/३/२०१९ बुधवार रोजी ह.भ.प. मुकुंदा महाराज ढेकू, दि.२१/३/२०१९ गुरुवार रोजी ह.भ.प.जितेंद्र महाराज म्हसावद व दि.२२/३/२०१९ शुक्रवार रोजी सकाळी ९ ते ११ वाजता ह.भ.प.प्रा चत्रभुज महाराज (सी.एस.पाटील सर) धरणगाव यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे.याच मंगलमय प्रसंगाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व या सप्ताहाच्या कार्यक्रमाला ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभते त्या सर्वांचा देखील सत्कार समारंभ करून ऋण व्यक्त केले जाणार आहे.तद्नंतर दुपारी १२ ते ३ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम व संध्याकाळी ७ ते १० वाजे दरम्यान पालखी सोहळा मिरवणुक निघणार आहे.अशा या सुनियोजित कार्यक्रमाला धरणगाव शहर व तालुका परीसरातील भाविक भक्तांनी सहभागी व्हावे व आपली अनमोल उपस्थिती द्यावी असे आवाहन व या सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आयोजन समस्त पाटील समाज पंच मंडळ, लहान माळी वाडा धरणगाव च्या सर्व संचालक मंडळाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.