धरणगाव येथे घनकचरा व्यवस्थापन विभागमार्फत जेसीबीचे लोकार्पण

0

धरणगाव :- शहरात नगरपालिका मार्फत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनसाठी व आरोग्य विभागा मार्फत डी.पी.आर. मधून धरणगाव शहरांतील घनकचरा संकलनासाठी 16 लाख 41 हजार रु.चे जेसीबीचे लोकार्पण शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी शिवसेना गटनेते पप्पू भावे आरोग्य सभापती अहेमद पठाण चर्मकार समाजचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांचा हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित नगरसेवक विजय महाजन. सुरेश महाजन, भागवत चौधरी, नंदू पाटील अजय चव्हाण, गुलाब मराठे, विभाग प्रमुख संजय चौधरी महेंद्र चौधरी वसीम पिजारी राजु चौधरी, भैय्या महाजन, गोपाल महाजन, कैलास वारुळे, संजू महाजन, ओ एस संजय मिसर, अशोक चव्हाण, प्रवीण देशपांडे, आरोग्य लिपिक संतोष चौधरी, राहुल तायडे, निलेश वाणी, किशोर खैरनार, अरुण पाटील, देवानंद तायडे, विनोद रोकडे व कर्मचारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.