आचारसंहिता म्हणजे कायरे भाऊ…!

0
  आचारसंहिता म्हणजे काय? हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो.  निवडणुका आणि राजकारण या विषयी  काहीशी विचीत्र प्रतिमाच त्यांच्यात तयार झाालेली आहे. अफाट खर्च, दादागिरी, गुंडगिरी  आदी प्रकार म्हणजेच निवडणूक, असे यापूर्वी सर्वसामान्य माणसाला वाटत होते;परंतु सर्व निवडणुक ांचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारी ही  आचारसंहिता म्हणजे नेमके काय? या विषयी मात्र सर्वसामान्य माणूस बर्‍यापैकी अनभिज्ञ राहिला, असे वाटले. खरेतर आचारसंहितेविषयी  पुरेपुर माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्याच दृष्टीकोनातून आचारसंहितेमधील काही महत्वपूर्ण नियमांची माहिती करून देणारा हा लेख प्रपंच     
        काही वर्षांपूर्वी थोडासा अपरिचित वाटणारा…आचारसंहिता… हा शब्द आता आपल्याला चांगलाच परिचित झाला असून आजच्या  पिढीला मात्र तो नवाच आहे. सर्वप्रथम या आचार संहितेच्या बडग्याने चांगल्या रथी महारथी उमेदवारांना नाकीनऊ आणले होते. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1989 साली मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी आचारसंहिता लागू केली. आणि तेव्हांपासून देशभरातील निवडणुकांच्या वातावरणात एक अनपेक्षित बदल झाला. शिस्तबध्द प्रचार आणि काहीशी वेगळ्या प्रकारची निवडणूक देशभरातील मतदारांना  बघायला मिळाली. निवडणुका आणि राजकारण या विषयी  काहीशी विचीत्र प्रतिमाच तयार झाालेली आहे. अफाट खर्च, दादागिरी, गुंडगिरी  आदी प्रकार म्हणजेच निवडणूक, असे यापूर्वी सर्वसामान्य माणसाला वाटत होते;परंतु सर्व निवडणुक ांचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारी ही  आचारसंहिता म्हणजे नेमके काय? या विषयी मात्र सर्वसामान्य माणूस बर्‍यापैकी अनभिज्ञ राहिला, असे वाटले. खरेतर आचारसंहितेविषयी  पुरेपुर माहिती असणे अत्यावश्यक आहे. त्याच दृष्टीकोनातून आचारसंहितेमधील काही महत्वपूर्ण नियमांची माहिती करून देणारा हा लेख प्रपंच जनहितार्थ मी प्रकाशित करीत आहे.
       आपला देश जगात सर्वात मोठा लोकशाही तत्वावर चालणारा देश आहे. कोणत्याही लोकशाहीप्रधान देशात निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. या निवडणुका शांतता आणि सामंजस्याने पार पडाव्यात असे प्रत्येकालाच वाटत असते;परंतु वाढती  स्पर्धा आणि बदलती राजकिय समीकरणे या गोष्टींमुळे दिवसेंदिवस निवडणुकांचे वातावरण गढूळ बनू लागलेय. जीवघेणी स्पर्धा वाढली आणि निवडणुकीत जिंकून येण्यासाठी प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करू लागला. कुणी मतदान केंद्रावरच कब्जा करू लागले. तर बर्‍याच ठिकाणी राजकिय वादातून ऐन निवडणुकांच्या काळात दिवसाढवळ्या मुडदे पडू लागले. या वाढत्या हिंसाचाराला आणि अराजकतेला  आळा बसणे खूप आवश्यक होते. म्हणून जनता पक्षाच्या राजवटीत म्हणजेच 2 ऑक्टोबर 1979 रोजी निवडणूक आचारसंहीता घोषित करण्यात आली होती. निवडणुक  आचारसंहिता म्हणजे निवडणुकीच्या काळात उमेदवार राजकिय पक्ष यांच्या बेलगाम वर्तणूकीवर घालण्यात  आलेले काही नियम हे नियम 1979 मध्ये बनवले गेले खरे पण त्यांना फक्त कागदोपत्रीच ठेवण्यात आले. नियम धाब्यावर बसवून राजकारण्यांचे बेलगाम आणि गुन्हेगारीशी निगडीत राजकारण सुरूच होते. 1979 साली निवडणूक आचारसंहिता तयार होऊनही त्यानंतर झालेल्या निवडणुकांमधील हिंसाचाराचे प्रमाण पहाता आपल्याला आचारसंहितेची किती आवश्यकता आहे हे लक्षात येऊ शकते. 1979 नंतर झालेल्या निवडणुकात अनुक्रमे 1984 साली 264 ठिकाणी 1989 साली 1605 ठिकाणी तर 1991 साली 2601 ठिकाणी हिंसाचार आणि कत्तली घडवण्यात आल्या.निमित्त फक्त निवडणूक. या हिंसाचाराच्या आकडेवारीवरून बेफाम सुटलेल्या राजकारण्यांना नियमात बांधून ठेवणे किती आवश्यक आहे, हे चटकन लक्षात येऊ शकते. राजकारण्यांच्या याच अरेरावीला रोखण्यासाठी 1979 मध्ये आचारसंहीता  बनवली गेली;परंतु ती अमलात आणायला सुरूवात झाली.ती 1992 साली आचारसंहीता लागू झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेली आचारसंहिता 1950 यावर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणुक आचारसंहितेचाही स्विकार करण्यात आला. यामध्ये निवडणुका जाहीर झाल्यावर राजकिय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे……….म्हणजेच निवडणुक आचारसंहिता होय.आणि सर्व सामान्य माणसाला निवडणुकांचे काही वेगळेच चित्र दिसू लागले. लोकशाही राज्यात शासन यंत्रणा फक्त नियम आणि कायदे राबवू शकते. पण त्यासाठी त्यांना इथल्या सर्वसामान्य जनतेची मदत मिळणेही खूप आवश्यक आहे. लोकशाहीची खरी रखवालदार त्या देशातील जनताच असते,असे म्हणतात. किंबहुना हीच खरी परिस्थिती आहे.शिवाय या उद्द्ाम राजकारण्यांच्या कारवाईला आळा बसावा, ही प्रत्येकाची सुप्त इच्छा असतेच  त्यासाठी आचारसंहीतेचे नियम समजवून घेवून त्याचा भंग होत असल्यास तक्रार करणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी आचारसंहिता म्हणजे काय हे समजवून घेणे महत्वाचे होय.
         सर्व साधारणपणे आचारसंहितेत काही नियम बनवण्यात आले आहेत. त्यात जाती धर्मांच्या नावावर प्रचार करून मते मिळविणे नियमबाह्य आहे. त्यामुळे कोणत्याही राजकिय पक्षाने किंवा उमेदवाराने एका ठराविक धर्माचा आधार घेवून इतर धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे वक्तव्य करू नये किंवा वेगवेगळ्या जाती, जमाती, भिन्न धर्मिय किंवा भिन्न भाषिक यांच्यात असणारे मतभेद वाढतील  किंवा जातीय तणाव अथवा वैमनस्य वाढण्याची शक्यता बळावेल अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यात राजकिय पक्षाने अथवा त्यांच्या अधिकृत उमेदवाराने सहभागी होवू नये, असा आचारसंहितेत नियमच बनवला गेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे चिरंतन चालत आलेली –                                             धर्मनिरपेक्षता किंवा सर्वधर्मसमभावांच्या भावनेला तडा जावू नये म्हणून कोणत्याही उमेदवाराने जातीय, धार्मिक भावना भडकतील, असे कोणत्याही पक्षाने तशी भूमिका ठरवू नये, असेही आचारसंहितेत म्हटलेले आहे.
       आपल्याकडेच काय पण संपूर्ण जगभरातल्या राजकारण्यांना एकमेकांवर आरोप करण्याची जुनी सवयच आहे. तसे राजकारण म्हटले की आरोप प्रत्यारोप आलेच पण एखाद्या विरोधकावर आरोप करतांनाही विशेष तारतम्य बाळगायला हवे. त्यासाठी जेव्हा कोणत्याही इतर राजकिय पक्षांवर टिका करण्यात येईल. तेव्हा त्या पक्षाच्या ध्येयधोरणे, कार्यक्रम आणि यापूर्वीचे काम यापुरतीच मर्यादित
असावी कोणत्याही विरोधकाच्या खाजगी जीवनातील गोष्टींवर टिका करू नये, किंवा कुणावरही बिनबुडाचे आरोप करू नये असाही नियम आचारसंहितेत बनवण्यात आला आहे.
       कोणत्याही उमेदवाराने जाती किंवा धर्माच्या आधारावर मते मिळवण्यासाठी मतदारांना आवाहन करू नये, असा नियम तर आहेच;परंतु मसजिद, चर्च, मंदीर यासह  आदी प्रार्थनास्थळांचा वापर निवडणुक प्रचाराच्या काळात कोणत्याही प्रकारे आर्थिक गैरव्यवहार  उमेदवाराने अथवा कोणत्याही राजकिय पक्षाने करू नये किंवा मतदारांना लाच अथवा भेटीस्वरूप कोणतीही वस्तू देता कामा नये. तसेच मतदारांना धाकडपटशा दाखवू नये. तसेच मतदारांशी तोतयागिरी करू नये किंवा मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या आत प्रचार करू नये, असेही नियम बनवण्यात आले आहेत.
 अविनाश चव्हाण
  मो..9326883740    

Leave A Reply

Your email address will not be published.