वरणगाव पाणी पुरवठा योजनेवरची स्थगिती उठली !

0

वरणगाव (प्रतिनिधी) : शहरासाठी मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी भाजप सरकारच्या काळात 25 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आलेली आहे परंतु सरकार बदलानंतर महाराष्ट्रातील सर्वच योजनेवरील स्थगिती देण्यात  आली होती पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने ही स्थगिती उठवण्याची मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियार व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली होती गिरीश महाजन यांनी स्वतः लक्ष घालून मुंबईत बसून या योजनेवरील स्थगिती उठविल्याने आता वरणगावकर यांना चोवीस तास पाणीपुरवठा मिळण्याचा रस्ता मोकळा झाले असल्याचे माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली

शहरासाठी नागरिकांना 24 तास पाणी मिळावे यासाठी 25 कोटी ची  पाणी पुरवठा योजना माजी जलसंपदामंत्री आ गिरीश महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 13 सप्टेंबर रोजी मंजूर करून दिली मंजूर पाणी पुरवठा योजनेच टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली मात्र राज्यात महाविकास आघाड्याचे सरकार आल्यानंतर देवेन्द्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात मंजूर झालेल्या  परंतु कार्यादेश न दिलेल्या नवीन योजनेला स्थगिती दिली स्थगिती उठवण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली परंतु योजनेवरील स्थगिती उठत नसल्याने नगराध्यक्ष सुनील काळे यांनी औरंगाबाद  उच्चनयालयात रिट पिटीशन क्रमांक   3275 दि 26 फेब्रुवारी  2020 दाखल केली होती यावर युक्तिवाद सुरू होता परंतु शहरात उन्हाळ्यात पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने जनतेचे हाल मोठ्याप्रमाणात होत आहे म्हणून वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेवरची स्थगिती उठवण्यात यावी यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशियार, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आ संजय सावकारे यांच्याकडे  ई मेल ने मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली होती यावर गिरीश महाजन आमदार संजय सावकारे यांनी देखील पत्रव्यवहार करून सदरच्या योजनेचे गांभीर्य शासनाला कळविले होते

गिरीश महाजन मुंबईत ठाण मांडून

युती सरकारच्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या अत्यावश्यक योजना मंजूर करण्यात आल्या होत्या परंतु शासनाने स्थगिती दिल्याने त्या त्वरित उठवावी अशा प्रकारची मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती ते मुंबईत बसून या प्रक्रिया वरती लक्ष देऊन होते आज नगर विकास विभागाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते प्रकल्प मंजूर करण्यात आले होते त्यापैकी ज्या प्रकल्पांचे कार्यादेश दिनांक 5 डिसेंबर 2020 पूर्वी देण्यात आले नव्हते हे अशा प्रकल्पांचे कार्यादेश पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये अशा सूचना शासनाने 5 डिसेंबरला दिल्या होत्या त्यासंदर्भात आज सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आले असून त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याचे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यात यावी व त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे वरणगाव येथील पंचवीस कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा रस्ता मोकळा झाला आहे

निविदा प्रक्रिया पूर्ण

शहरातील सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 25 कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत पालिकेकडे सीलबंद निविदा आलेले आहेत या ओपन केल्यानंतर कार्यादेश देता येईल तसेच पालिकेच्या खात्यावरती या योजनेसाठी सहा महिन्यापूर्वीच सव्वा कोटी रूपये निधी जमा आहे

युती सरकारच्या काळात अत्यावश्यक योजनांना मंजुरी देण्यात आली होती परंतु या योजनांवर स्थगिती देण्यात आली होती परंतु या योजना आवश्यक असून त्या पूर्णत्वास येणे गरजेचे असल्याचे प्रधान सचिव व मुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिले व आज वरणगाव सह महाराष्ट्रातील इतर योजनांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे.
– गिरीश महाजन, माजी मंत्री

पाण्यासाठी राजकारण नाही

अडीच वर्षाचा कालावधी मला नगराध्यक्ष म्हणून मिळाला या काळात झपाटल्यासारखे शहराच्या विकासासाठी काम केले आणि वरणगाव शहरासाठी विविध विकास काम सोबतच 25 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे यासाठी वरणगाव शहरातील सर्वच जनतेसह  नगरसेवकांची मदत मिळाली शहराच्या विकासात राजकारण केले नाही यापुढे करणार नाही स्थगिती उठवल्या बद्दल राज्यपाल भगत सिंग कोशियार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी पालकमंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांचे आभार मानतो

-सुनील काळे नगराध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.